माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीत आपले स्वागत!

'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' असं महाराष्ट्राच्या भूमीचं वर्णन केलं जातं. सह्यगिरीच्या कुशीत मनमुराद भटकंती करताना जीवाला वेड लावणारं हे सौंदर्य डोळे भरून पाहिलं. अगदी जवळून अनुभवलं. कॅमे-यात टिपण्याचा प्रयत्न केला. हे सारं आणखीन कोणाला तरी सांगण्याच्या उर्मीतून ही वेबसाईट तयार करण्यात आली. मला मिळाला तसाच अपूर्व आणि अवर्णनीय आनंद ही साईट पाहताना आणि मग प्रत्यक्षात भटकंती करताना तुम्हालाही मिळेल, खचितच! हा प्रपंच यासाठीच. पुढे वाचा >>

फोटोग्राफी
साहित्य
मुक्तपत्रकारिता
शिक्षण

भटक्यांची पंढरी: हरिश्चंद्रगड

सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईन्टस आहेत. त्यातला हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा दुर्गवेड्यांचा अगदी 'विक पॉईन्ट'. 'भटक्यांची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे, खोल दऱ्या, उरात धडकी भरविणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडविणारी देखणी मंदिरे, लेणी समूह... सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईन्टस आहेत. त्यातला हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा दुर्गवेड्यांचा अगदी 'विक पॉईन्ट'. 'भटक्यांची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे असलेल्या या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण पुढे वाचा

सबंधित लेख: देखणे भूशिल्प रतनगड | भंडारदर्‍यातील धारानृत्य! |
सबंधित छायाचित्रे: हरिश्चंद्रगड | रतनगड |

सह्यागिरीतला जलोत्सव

तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून पाऊस घाटाच्या दिशेने सरकायला लागतो, तसा येथला निसर्ग चैतन्याने मोहरतो. लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे जलरंगांच्या छटांमध्ये न्हाऊन निघतात. माहेराला आल्यागत मोसमी पाऊस येथे रमतो. (सध्या तो रुसलाय बरं!) अवघ्या सृष्टीशी त्याचं गुज सुरु होतं. पाऊस म्हणजे सृष्टीचा साखाच जणू! चैतन्याचा दाता असलेल्या पावसाच्या आगमनाने बघता-बघता सृष्टीचे रुपडे आपल्या डोळ्यांदेखत बदलून जाते. चिंब पावसाने रान आबादानी होते. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी चैतन्याची सळसळ सगळीकडे जाणवू लागते. टपो-या थेंबांनी ओघळणारा पाऊस, पर्वत-शिखरांवरून झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात, पुढे वाचा

सबंधित लेख: 'इंद्रवज्राचा' देखावा! | सह्यागिरीला साज रानफुलांचा! |
सबंधित छायाचित्रे: प्राणी जीवन |

विडीओ गॅलरी

सह्यगिरी फेसबुकवर

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )